E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
आर्थिक ताणामुळे भारताशी लष्करी संघर्ष परवडणारा नाही
Samruddhi Dhayagude
09 May 2025
IMF च्या बैठकीकडे पाकिस्तानचे लक्ष
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्यत्तरामुळे पाकिस्तानची पाळता भुई थोडी झाली आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूरद्वारे हवाई हल्ले केले. यानंतर पाकिस्तानने काल भारतीय सीमेसह सीमेलगतच्या शहरांवर ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यानंतर दोन्ही देशांमधील तणावात आणखी भर पडली आहे.
वॉशिंग्टनमध्ये शुक्रवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) महत्त्वपूर्ण बैठकीत पाकिस्तानच्या वित्तपुरवठा सुविधांचा गंभीरपणे आढावा घेतला जाणार आहे. रोखीच्या तुटवड्यामुळे त्रस्त आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानसाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट करत आयएमएफकडून पाकिस्तानला अतिरिक्त निधी देण्यास विरोध दर्शवला आहे.
भारताने गुरुवारी आयएमएफ सदस्यांना पाकिस्तानला उदारतेने आर्थिक मदत करण्यापूर्वी, मिळालेल्या आर्थिक मदतीचा ते कसा वापर करतात हे एकदा लक्ष देऊन पाहावे, असे आवाहन केले.
दोन्ही देश दीर्घकाळ चालणाऱ्या लष्करी संघर्षात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर चिंता निर्माण झाली आहे. असे असले तरी, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती दीर्घकाळ चालणाऱ्या लष्करी संघर्षासाठी चांगली नाही.
सध्याच्या घडीला पाकिस्तानवर परकीय कर्जाचे प्रमाण जास्त आहे, त्याचबरोबर परकीय चलन साठाही अत्यंत कमी आहे. याचबरोबर ते चलनवाढीचा सामनाही करत आहेत. २०२४ मध्ये पाकिस्तानचे परकीय कर्ज १३० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाले, यातील सर्वाधिक कर्ज त्यांचा प्रमुख मित्र देश चीनकडून घेतल्याचा अंदाज आहे.
याउलट, पाकिस्तानचा परकीय चलन साठा १५ अब्ज डॉलर्सपेक्षा थोडा जास्त आहे, जो फक्त तीन महिन्यांच्या आयातीसाठी पैसे देण्यास पुरेल इतकाच आहे. फेब्रुवारीमध्ये फिचच्या अहवालानुसार, निधीच्या गरजांच्या तुलनेत राखीव निधी कमी आहे.
वाढती कर्ज पातळी आणि राखीव निधी घटल्यामुळे, पाकिस्तानला सप्टेंबर २०२४ मध्ये आयएमएफकडून ७ अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या मंजुरीसह बेलआउट पॅकेज मिळविण्यात यश आले होते. यानंतर त्यांची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या उंबरठ्यावरून सावरण्याची काही सुरुवातीची चिन्हे दिसली आहेत.आयएमएफने एप्रिलमध्ये प्रसिद्ध केलेल्या दक्षिण आशिया विकास अहवालानुसार, नैसर्गिक आपत्ती, बाह्य दबाव आणि महागाईतून पाकिस्तानची अर्थव्यवस्था सावरत आहे.
Related
Articles
पुण्यात जोरदार पाऊस
05 Jun 2025
आगामी साहित्य संमेलनाच्या स्थळाची ८ जूनला निश्चिती
05 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
पुण्यात जोरदार पाऊस
05 Jun 2025
आगामी साहित्य संमेलनाच्या स्थळाची ८ जूनला निश्चिती
05 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
पुण्यात जोरदार पाऊस
05 Jun 2025
आगामी साहित्य संमेलनाच्या स्थळाची ८ जूनला निश्चिती
05 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
पुण्यात जोरदार पाऊस
05 Jun 2025
आगामी साहित्य संमेलनाच्या स्थळाची ८ जूनला निश्चिती
05 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी